Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातून आगीची एक अत्यंत भीषण बातमी समोर येत आहे. नवापूर एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली असून आगीची

माळाकोळी येथे जलजीवन मिशनच्या पाइपसाठ्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
ठाण्यात शिवशाही बस जळून खाक;15 प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांत भीतीचे वातावरण
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल  कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट | Nandurbar  Fire News ...

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातून आगीची एक अत्यंत भीषण बातमी समोर येत आहे. नवापूर एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली असून आगीची तीव्रता इतकी मोठी आहे की १५ किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत आहेत.
नवापूर एमआयडीसीमधील ‘E21 श्रीनिझो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड’ या टेक्स्टाईल कंपनीला आज अचानक आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि कंपनीत एकापाठोपाठ एक ३ मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण आकाश धुराने काळवंडले आहे.
आगीची भीषणता पाहता नवापूर नगरपालिकेसह शेजारच्या गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा आणि महाराष्ट्रातील नंदुरबार, साक्री, पिंपळनेर येथून अतिरिक्त अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनीत कापड आणि कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवताना अडथळे येत आहेत. या आगीत ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला तरी, एमआयडीसीमधील इतर कंपन्यांना आग पसरू नये यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सध्या सर्व यंत्रणा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र या घटनेने एमआयडीसीमधील फायर ऑडिट आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS