Homeताज्या बातम्याराजकारण

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नेतृत्व कायमगुवाहाटीत उद्या होणार मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी

गुवाहाटी : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर भाजपने विश्‍वास व्यक्त केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त

दैनिक लोकमंथन l महाराष्ट्रात उद्यापासून मर्यादित टाळेबंदी
जोतिबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या शेतमजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली ; एक ठार, 20 जण जखमी |
खेलो इंडीयामुळे ग्रामीण खेळाडूना मोठी संधी : डॉ. सुस्मिता विखे पाटील
हिमंता बिस्वा सरमा - विकिपीडिया


गुवाहाटी : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर भाजपने विश्‍वास व्यक्त केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली असून, ते सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 12 मे रोजी गुवाहाटी येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
केंद्रीय निरीक्षक आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक झाली. बैठकीनंतर नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी विविध आमदार आणि वरिष्ठ नेत्यांकडून एकूण आठ प्रस्ताव मांडण्यात आले. रणजित कुमार दास, विश्‍वजित, अजंता निओ, रामेश्‍वर तेली, राजदीप राय, अशोक स्घिंल, पियुष हजारिका आणि चक्रधर गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला. सर्व प्रस्तावांना आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्‍चित झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनीही हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला. मित्रपक्षाचे नेते अतुल बोरा यांनीही त्यांच्या नावाला समर्थन जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी आघाडीत एकोपा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. 126 सदस्यीय विधानसभेत भाजपने स्वबळावर 82 जागांवर विजय मिळवला, तर मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 102 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. निवडणुकीच्या प्रचारात हिमंता बिस्वा सरमा यांनी आघाडीची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विकास, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर भर दिला होता. हिमंता बिस्वा सरमा यांच्या दुसर्‍या कार्यकाळात राज्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS