Homeताज्या बातम्यादेश

शोल्डर- इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या इंडिया अध्यक्षपदीमेन -इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची निवड

नवी दिल्ली : रस्ता सुरक्षा, आधुनिक रस्ते विकास आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी कार्यरत असलेल्या जगप्रसिद्ध इंटरनॅशनल रोड फेडरेशनच

केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघातभवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
खासबाग देवी मंदिर-मोमिनपुरा बायपास मार्गावर पुलाची तातडीने उभारणीची मागणी
उत्तर प्रदेशातील अपघातात दहा जणांचा मृत्यू
Administrative Reshuffle: Anilkumar Gaikwad Appointed As New MD Of MSRDC,  Replaces Mopalwar


नवी दिल्ली : रस्ता सुरक्षा, आधुनिक रस्ते विकास आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी कार्यरत असलेल्या जगप्रसिद्ध इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या भारताच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभियंता इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रासह देशातील अभियांत्रिकी क्षेत्रात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंजि. डॉ. गायकवाड हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या यशस्वी उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचे नेतृत्व विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील विशाल बोगद्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली असून त्याची नोंद विक्रम पुस्तकात करण्यात आली आहे. या कार्याबद्दल राज्य शासनाकडून त्यांचा विशेष गौरवही करण्यात आला होता. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील दूरदृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी नेतृत्व यामुळे इंजि. डॉ. गायकवाड यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील बांद्रा-वर्ली सागरी सेतू, वैतरणा नदीवरील उंच लोखंडी पूल, मंत्रालय व उच्च न्यायालयाच्या इमारतींचे नूतनीकरण, तसेच समृद्धी महामार्ग यांसारख्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. रस्ते, पूल, बोगदे आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारणीमध्ये त्यांनी केलेले कार्य देशासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे भारतातील पायाभूत सुविधा विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केला जात आहे. इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या इंडिया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देशभरातून अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS