Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सतीश गर्जे यांची नियुक्ती

पाटोदा प्रतिनिधी - शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश गर्जे यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पाटोदा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा
नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक | LokNews24
पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात

पाटोदा प्रतिनिधी – शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश गर्जे यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पाटोदा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सतीश गर्जे हे तरुण तडफदार व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पाटोदा तालुक्यात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्य करताना तसेच बाल हक्क संरक्षणच्या माध्यमातून बालगोपाळांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरीची असूनही त्यांनी कडा आणि पाटोदा येथे आपले शालेय, माध्यमिक व पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पाटोदा तालुक्यातील चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हमीद खान पठाण यांच्या अनुमोदनानंतर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना च्या पाटोदा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, प्रसिद्धी प्रमुख सोपणे मामा यांनी एक मताने नियुक्तिपत्र दिले असून संघटनेत कार्य करताना संघटनेच्या उद्देशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचार्‍यांच्या समस्या आपल्या संघटनात्मक कार्यातून सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहावे असे म्हटले आहे. सतीश गर्जे यांना बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी हमीद खान पठाण, किरण मुगळीकर, अशोक भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस वसाहतसाठी लढा उभारणार-सतीश गर्जे
पाटोदा शहरात पोलिसांसाठी शासकीय पोलीस वसाहत नाही. पोलिसांसाठी लवकरात लवकर शासकीय वसाहत निर्माण करण्यात यावी. याकरिता संघटनेच्या माध्यमातून आता मोठा लढा उभारणार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस प्रशासनात भरती होऊन सेवा करण्याचा मानस होता परंतु ही संधी काही मिळाली नाही. यामुळे आता संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी सदैव झोकून देऊन कार्य करणार आहे.

COMMENTS