Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

100 टक्के अनुदानावर पशुपालकांना चारा बियाणे वाटप; विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत योजना सुरू

नांदेड : जिल्ह्यातील पशुपालकांना आता 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज कर

पीपल्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयवंत येवतीकर यांचे निधन
एलसीबीच्या नावाखाली आर्थिक लुटीचा खेळ? व्यापारी वर्गात भीतीचे सावट तीव्र
जिल्हाधिकारी कार्यालयात 12 मे रोजी पेन्शन अदालत
Amarnath - नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त  जीएसटी नांदेड : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल ...

नांदेड : जिल्ह्यातील पशुपालकांना आता 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांसाठी दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शुगर ग्रेझ, स्पीड फीड ज्वारी तसेच सुधारित मका बियाण्यांचे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सरकारी व खाजगी दूध डेअरी तसेच दूध उत्पादक संघांना दूध पुरवठा करणार्‍या पशुपालकांना मिळणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी तचऊऊझ संकेतस्थळॠश्न वर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, किमान एक एकर जमिनीचा सातबारा उतारा, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे दूध पुरवठा प्रमाणपत्र तसेच किमान तीन दुधाळ जनावरांचे टॅग क्रमांक आवश्यक राहणार आहेत. दर्जेदार चार्‍यामुळे जनावरांना सकस आहार मिळून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि दूध उत्पादन वाढीस मदत होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम बी. खुणे यांनी दिली.

COMMENTS