Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या व शिलाई मशिनचे वाटप

नांदेड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना

हेलिकॉप्टरमधून एकाच वेळी; दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी
संरक्षणाप्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करण्याची गरजसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रयागराज येथे प्रतिपादन
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा;विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

नांदेड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या व शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवत घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संध्याताई फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्याताई बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात ग्रामीण व शहरी भागातील महिलांना पिठाच्या गिरण्या आणि शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले. महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. अनेक महिलांनी या सुविधेमुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली. शिलाई मशिन व पिठाच्या गिरण्यांमुळे घरातूनच रोजगार सुरू करण्याची संधी मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी संध्याताई कल्याणकर यांनी महिलांनी आत्मनिर्भर बनून उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन केले. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन कायम कटिबद्ध राहील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS