Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रेडाईच्या वतीने कामगार कल्याण सप्ताहाचे आयोजन;श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान अंतर्गत विविध उपक्रम राबविणार-अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा

अंबाजोगाई : क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने बांधकाम कामगारांप्रती कृतज्ञता - 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक सन्मान - आपले योगदान, आमचा अभिमान

धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेतील रविकुमार शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन

अंबाजोगाई : क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने बांधकाम कामगारांप्रती कृतज्ञता – 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कामगार कल्याण सप्ताह साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून, यामध्ये बांधकाम कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि जीवनमानाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला असल्याची माहिती अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा व सचिव पवन भराडीया यांनी दिली आहे.
मंगळवार, दिनांक 5 मे रोजी क्रेडाई महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शाखेच्या वतीने कामगार कल्याण सप्ताहास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रचना परदेशी तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक बप्पा सिरसाठ (धारूर), शुभम थोरवे (जेएसडब्ल्यु स्टीलचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक), धनराज जाधव (कुबेर स्टील डेपोचे प्रमुख व्यवस्थापक), श्रीगोपाल लोहिया (लोहिया स्टील), सुरेश शेळके (चेअरमन, धनलक्ष्मी मल्टिस्टेट, धारूर), ज्येष्ठ समाजसेवक बाबुराव शिनगारे गुरूजी (व्यापारी संघ, धारूर), श्री.कळसकर साहेब (मोजणी अधिकारी), अभय भावठाणकर (उद्योजक), बंडू मुंडे (प्रगतशील शेतकरी), सौ.अनिताताई सुराणा (अध्यक्ष, सेवाभारती शिक्षण संस्था, लातूर) हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी 70 हून अधिक बांधकाम कामगार सहभागी झाले होते. या सर्व कामगारांना जेएसडब्ल्यु स्टीलकडून टी-शर्ट वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शुभम थोरवे (जेएसडब्ल्यु स्टीलचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक) यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रात सातत्याने नवीन तंत्रज्ञान येत असून गुणवत्तापूर्ण कामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. बांधकाम क्षेत्राचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या कामगारांच्या कौशल्य विकासासाठी क्रेडाई महाराष्ट्रकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कामगार कल्याण सप्ताहामुळे अंबाजोगाईच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा मिळेल. प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होईल तसेच कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर अध्यक्षीय समारोप करताना रचना परदेशी यांनी सांगितले की, अशा उपक्रमांचा उद्देश हा बांधकाम क्षेत्रातील कामगारांना अधिक सक्षम आणि सुरक्षित करणे हा आहे असे सांगून त्यांनी सातत्याने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल क्रेडाई अंबाजोगाई शाखेचे कौतुक केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा यांनी सांगितले की, क्रेडाई महाराष्ट्र यांच्या वतीने कौशल्य विकास आणि कामगार कल्याण समिती तसेच सीएसआर समितीद्वारे बांधकाम कामगारांप्रती कृतज्ञता सप्ताह – 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने साजरा केल्या जाणार्‍या सप्ताहाच्या निमित्ताने पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान या अंतर्गत 1) बीओसीडब्ल्यू नोंदणी मोहीम राबविली जाईल., 2) सर्व बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य, नेत्र व दंत तपासणी, तसेच मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, थायरॉईड इत्यादींसारख्या उपयुक्त चाचण्या केल्या जातील., 3) कामगारांमध्ये आर्थिक साक्षरता, सुरक्षित बँकिंग पद्धती, बचतीची सवय, तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य जपणुकीचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण करणे., 4) बांधकाम स्थळांवर पाळल्या जाणार्‍या सुरक्षा उपाययोजनांच्या महत्त्वाविषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे., 5) कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे., 6) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, जीवनज्योती विमा योजना इत्यादींसारख्या कामगार कल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करणे., 7) नोंदणीकृत कामगार आणि गरजू विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे संच (किट्स) व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे तसेच कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी कौतुक आणि गौरवपर कार्यक्रमांचे आयोजन करणे आदी विविध उपक्रम राबविण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष सुराणा यांनी दिली आहे. उपस्थितांचे आभार बाबुराव शिनगारे गुरूजी यांनी मानले. तर सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई क्रेडाईचे सचिव पवन भराडीया, अमोल पवार, राहुल कापसे, कुलदीप परदेशी, खंडू पिसाळ, रवि बिक्कड, सुमित काकडे, संदीप दुगाने, वैभव चाटे, डॉ.संमकीत सुराणा, रब्बानी भाई, अमोल सरवदे आदींनी पुढाकार घेतला होता.

COMMENTS