Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका विजया देवकर  

कोपरगाव : नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची नुकतीच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर जनआरोग्य समिती’ मध्ये अध्यक्षपदी निवड झाली.  त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यापूर्वी देखील देवकर यांनी नगरसेविका म्हणून उत्तम काम केलेले आहे.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर येथे कोपरगाव जन आरोग्य समिती सदस्य निवड समारंभ नुकताच पार पडला. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल कोपरगाव शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.  आ. विवेक  कोल्हे तसेच नगरध्यक्ष पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली महिला नगरसेविका म्हणून  विजया देवकर या उत्तम कार्य करत असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असतात. देवकर ह्या जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी त्या योग्यरीत्या जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल माजी आ.स्नेहलता कोल्हे, आ. विवेक  कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सर्व नगरसेवक आदीसह मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महावितरणचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ शेख अखिल उस्मान यांनाकर्तव्यनिष्ठ सेवेमुळे लातूर परिमंडळाकडून गौरव; माजलगांवात आनंदाचे वातावरण
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मेडिकल कॉलेज विभाग शाळेत श्री.व्यंकटेश चामनर सर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती
जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

कोपरगाव : नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची नुकतीच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर जनआरोग्य समिती’ मध्ये अध्यक्षपदी निवड झाली.  त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यापूर्वी देखील देवकर यांनी नगरसेविका म्हणून उत्तम काम केलेले आहे.

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर येथे कोपरगाव जन आरोग्य समिती सदस्य निवड समारंभ नुकताच पार पडला. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल कोपरगाव शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 आ. विवेक  कोल्हे तसेच नगरध्यक्ष पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली महिला नगरसेविका म्हणून  विजया देवकर या उत्तम कार्य करत असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असतात. देवकर ह्या जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी त्या योग्यरीत्या जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल माजी आ.स्नेहलता कोल्हे, आ. विवेक  कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सर्व नगरसेवक आदीसह मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS