Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल आज होणार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार 8 मे रोजी दुपारी एक वाज

दहावीचा निकाल जाहीर; मुलींनीच मारली बाजी ९२.०९ टक्क्यांसह राज्याचा निकाल लागला; कोकण विभाग टॉपवर
सावित्रीच्याच लेकींचा डंका !
दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार 8 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी अकरा वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहता येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, निकाल जाहीर होण्याबाबत मंडळाने अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा गुणपत्रक तपासण्यासाठी मंडळाच्या विविध अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे. निकाल पाहताना बैठक क्रमांक आणि आईचे नाव यांची आवश्यकता भासू शकते. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल कमी कालावधीत जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असताना आता मे महिन्यातच निकाल जाहीर होत आहेत. यंदा बारावीचा निकाल 2 मे रोजी घोषित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दहावीचाही निकाल जाहीर होत आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://results.navneet.com

COMMENTS