Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजेबाचा नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; पीडितेच्या आई-वडिलांकडून कठोर शिक्षेची मागणी

पुणे : शहरातील पर्वती परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका सत्तर वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या अल्पवयीन नातीवर अत्याचा

तुटणारे संसार जोडणारे अर्धापूर केंद्र; 1 हजार 778 प्रकरणांत यशस्वी समेट
मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
दारुड्या मुलाचा राडा; वडिलांवर कोयत्याने वार करून चिमुकलीलाही फेकून दिले
पुण्यात आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, पोलिसांनी काय  सांगितलं? आई-वडिलांची मागणी काय?

पुणे : शहरातील पर्वती परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका सत्तर वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या अल्पवयीन नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
माहितीनुसार, मुलीचे आई-वडील दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात. संबंधित दिवशी सायंकाळी मुलगी घरी असताना आरोपीने तिला फूस लावून जवळ घेतल्याचे सांगितले जाते. रात्री आई घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या अंगावर ओरखडे असल्याचेही लक्षात आल्याने आई हादरली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, आरोपी हा तिचाच वडील आहे. यापूर्वीही त्याच्या वर्तनाबाबत संशय निर्माण झाला होता. मुलीनेही पूर्वी एकदा अशाच प्रकारातून कसाबसा बचाव केल्याचे सांगितले. मात्र त्या वेळी हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात आला नव्हता. या वेळी मात्र गंभीर घटना घडल्याने तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपीला सुमारे वर्षभरापूर्वी चोरीच्या घटनेनंतर घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तो वेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे समजले होते. मात्र तो पुन्हा परिसरात येत असल्याची माहिती नव्हती. संबंधित दिवशी त्याने मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ घेतले आणि गैरकृत्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत व संरक्षण दिले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS