Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निराधार योजनेचा नाही आधार

नऊ महिन्यापासून अनुदान बंद; मरण मागत आहे पण देव मरणही देत नाही

मुखेड प्रतिनिधी - अठरा विश्व दारिद्रय पाचविला पुंजलेले...त्यात घरातील कर्ता पुरूष गेला...तेव्हापासून संसार उघड्यावर पडला... वय वाढत गेलं काम होत

लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी तालुका, शहराध्यक्षाची निवड लवकरच -हरिहर भोसीकर
सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!

मुखेड प्रतिनिधी – अठरा विश्व दारिद्रय पाचविला पुंजलेले…त्यात घरातील कर्ता पुरूष गेला…तेव्हापासून संसार उघड्यावर पडला… वय वाढत गेलं काम होत नाही … घरात खायाला अन्न नाही …पोटाची भूक राहात नाही … दोन-दोन दिवस उपाशी पोटी राहून दिवस काढते आहे… निराधार योजनेचा आधार मिळेल असे वाटत होते.पण तेही अनुदान बंद झाल्यामुळे घरात खायाला अन्नाचा कण नाही … तहसिलदार यांना अनेकदा भेटलो पण तहसिलदारही काम करत नाही… दोन दोन दिवस उपाशी पोटी राहु शकत नाही .. देवाने मरण दिले तर बरे पण देवही मरण देत नाही… ह्दय पिटाळून लावणारी ही,व्यथा आहे. मुखेड तालुक्यातील बेन्नाळृ येथील मथुराबाई गोविंद येळगे, या वयोवृद्ध आजीची..

       सन 1980 पासून  राज्य सरकार कडून राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक महत्वकांक्षी योजनाम्हणजेसंजय गांधीनिराधारयोजना ही,  असून  या योजनेअंतर्गतस्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणार्‍या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. 65 वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणार्‍या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या निराधार  योजनेच्या माध्यमातून आधार देऊन  त्यांचे जीवान मान उंचावण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे अनेक गरीबांना जगण्याच्या अशा पल्वीत झाल्या आहेत. पण मुखेड तालुक्यातील बेन्नाळ येथील वयोवृध्द व असाह्य असणार्‍या मथूराबाई गोविंद येळगे, या निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पाञ असतानाही केवळ तहसिदार व कर्मचार्‍यांच्या निष्काळजी पणा मुळे   यांना गेल्या नऊ महिन्यापासून मिळणार्‍या मानधनापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे यांच्यावर आज उपास मारीची वेळ आली असून बेन्नाळ गावाचीच बाईलेक असल्यामुळे व तिचे अन्न , पाण्यावाचून होत असलेले हाल बघावत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी माणूसकी धर्म पाळत त्यांना अन्न व इतर होईल तेवढी मदत करत आहेत. पण गेल्या नऊ महिन्यात या निराधार महिलेचे अनुदान नियमित चालू करण्यासाठी माझी सरपंच श्रीकांत काळे, यांनी मथुराबाई येळगे ,यांना घेऊन तहसिलदार यांची अनेक वेळा भेट घेऊन रोखण्यात आलेले पैसे देण्याची विनंती केली. पण तसिलदार यांना या महिलेचे आजपर्यंत काही दुःख समजले नाही. हे, दुर्देवच म्हणावे लागेल. आज या महिलेला शासनाच्या कोणत्याच योजनेचा आधार नाही. जगावे तर कसे..? असा प्रश्न आज या  वृद्ध आजी समोर उभा टाकला आहे.  निधान सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार या महत्वकांक्षी  योजनेचा तरी लाभ  या असाह्य वयोवृध्द आजीला  मिळावा. नाहीतर अन्न ,पाण्यावाचून या आजीचा मृत्यू होईल अशी चिंता गावक-यांमधून व्यक्त आहे.  पण तहसिल कर्मचार्‍यांच्या नाकार्तेपणामुळे या आजी संजय गाधी निराधार योजनेपासून वंचीत राहिलेली असून त्यांच्यावर आज उपास मारीची वेळ आलेली आहे.
या योजनेतून मिळणार्‍या मानधनावर माझे आयुष्य कसेतरी जगत होते. पण गेल्या नऊ महिन्यापासून मानधन बंद केले असल्यामुळे आज माझ्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे. घरात दुसरे कोणीही नाही. देव मरणही देईना. अन् तालुक्याचा साहेब पासबुकवर पैसेही टाकणा.मग म्या जगू कशी.? मला सांगा.
– मथुराबाई येळगे, बेन्नाळ.
या वयोवृध्द आजीचे बंद करण्यात आलेले मानधन चालू करण्यासाठी यांना सोबत घेऊन तहसिलदार यांची दहा ते आकरा वेळेस प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली.पण तहसिलदार यांनी आम्हांला उध्दटपणाची भाषा वापरून परत पाठविले असल्यामुळे आज या वयोवृध्द आजीवर उपास मारीची वेळ आलेली आहे. हे, दुर्देवच म्हणावे लागेल. या आजीचे मानधन जर चालू करण्यात आले नाहीतर तहसिल कार्यालयासमोर पुर्ण गावक-यांना घेऊन  तहसिल प्रशासनाच्य विरोधात मोर्चा काढणार.
– माझी सरपंच श्रीकांत काळे. बेन्नाळ.

COMMENTS