पाथर्डी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पाच सदस्यीय शासकीय समितीने तालुक्यातील शिरसाटवाडी येथे भेट देऊन गावात झालेल्या विविध विकास

पाथर्डी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पाच सदस्यीय शासकीय समितीने तालुक्यातील शिरसाटवाडी येथे भेट देऊन गावात झालेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी समितीचे प्रमुख गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी गावातील झालेली विकास कामे व सरपंच भावना पालवे यांचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, ग्रामसेवक अशोक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई शिरसाट, कर्मचारी अंकुश शिरसाट, अशोक फुंदे, बाबुराव शिरसाट उपस्थित होते.
यावेळी समितीने गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते, देवस्थान सभामंडप, भूमिगत गटारे, स्ट्रीट लाईट, सिंगल फेज वीज व्यवस्था, सुसज्य ग्रामपंचायत कार्यालय, अद्ययावत व्यायामशाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसह विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासन दरबारी पाठपुरावा करून गावात पायाभूत सुविधा निर्माण करणे व त्या माध्यमातून गावाचा विकास साधणे हेच सरपंचाचे प्रमुख काम असते. शिरसाटवाडी गावामध्ये झालेल्या विकास कामांवर समाधानी असल्याचे मत व्यक्त करत सरपंच भावना पालवे यांचे कौतुक केले.

COMMENTS