Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिया पठाण बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

कर्जत : बारावी परीक्षेत समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतची जिया अमजद पठाण  कर्जत तालुक्यात प्रथम आली. जिया पठाण हिने या परीक्षेत विज्ञान शाखेत ९०.५०% गुण मिळविले. गेल्या वर्षीपासून समर्थ विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व सी.ई.टी.च्या स्पेशल बॅचचे नियोजन करण्यात आले. या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात आली. त्याचाच फायदा बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना झाला. इयत्ता दहावीसाठी ही पुढील परीक्षांची तयारी करून घेण्यात आली आहे. समर्थ विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे. विद्यालयातील अनुभवी शिक्षकवृंदांनी केलेले सी.ई.टी. व नीट परीक्षांसाठीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच ज्यादा तासिकांचे नियोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शनही करण्यात आले.  बारावी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत जिया पठाण ९०.५० % गुणांसह विद्यालयात व तालुक्यात सर्वप्रथम, श्लोक किशोर सांगळे ८७.६७ % गुणांसह द्वितीय तर अनुष्का मुकुंद अनारसे ८७.३३ % गुणांसह तृतीय आली. या बोर्ड परीक्षेत हिंदी विषयात ९६ गुण, रसायनशास्त्र विषयात ९३ गुण, जीवशास्त्र विषयात ९८,९८,९७ गुण मिळवत प्रत्येकी तीन विद्यार्थी व ॲग्री विषयात ९८,९८,९८ गुण मिळवून प्रत्येकी तीन विद्यार्थी या विषयांमध्ये सर्वप्रथम राहिले.  जिया पठाण ही कर्जतचे नायब तहसीलदार डॉ. मोहसीन शेख यांची भाची असून तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खननावर चकलांबा पोलिसांची कारवाई; 15.03 लाखांचा मुद्देमाल जप्त
इज्तेमाच्या मंडप उभारणीचा माजी आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ
मळगंगा देवीच्या घागरी दर्शनासाठी लाखो भाविक

कर्जत : बारावी परीक्षेत समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतची जिया अमजद पठाण  कर्जत तालुक्यात प्रथम आली. जिया पठाण हिने या परीक्षेत विज्ञान शाखेत ९०.५०% गुण मिळविले.

गेल्या वर्षीपासून समर्थ विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व सी.ई.टी.च्या स्पेशल बॅचचे नियोजन करण्यात आले. या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात आली. त्याचाच फायदा बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना झाला. इयत्ता दहावीसाठी ही पुढील परीक्षांची तयारी करून घेण्यात आली आहे.

समर्थ विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे. विद्यालयातील अनुभवी शिक्षकवृंदांनी केलेले सी.ई.टी. व नीट परीक्षांसाठीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच ज्यादा तासिकांचे नियोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शनही करण्यात आले.

 बारावी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत जिया पठाण ९०.५० % गुणांसह विद्यालयात व तालुक्यात सर्वप्रथम, श्लोक किशोर सांगळे ८७.६७ % गुणांसह द्वितीय तर अनुष्का मुकुंद अनारसे ८७.३३ % गुणांसह तृतीय आली. या बोर्ड परीक्षेत हिंदी विषयात ९६ गुण, रसायनशास्त्र विषयात ९३ गुण, जीवशास्त्र विषयात ९८,९८,९७ गुण मिळवत प्रत्येकी तीन विद्यार्थी व ॲग्री विषयात ९८,९८,९८ गुण मिळवून प्रत्येकी तीन विद्यार्थी या विषयांमध्ये सर्वप्रथम राहिले.  जिया पठाण ही कर्जतचे नायब तहसीलदार डॉ. मोहसीन शेख यांची भाची असून तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS