Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा : आ.आशुतोष काळे

कोपरगाव : देशातील १६ वी जनगणना १ मेपासून सुरू होत असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. नागरिकांनी या जनगणना प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपली माहिती अचूकपणे नोंदवावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. जनगणना प्रक्रियेबाबत माहिती देताना आ. काळे म्हणाले, प्रारंभी घरगणना होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना केली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात ‘स्वगणना’ ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून नागरिकांना अधिकृत पोर्टलवर मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या स्वतःची माहिती भरता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी आपली माहिती अचूक भरावी, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. “महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून तो आपल्या एकतेचा, परिश्रमाचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे. संतांची, शूरवीरांची आणि कष्टकरी जनतेची ही भूमी असून राज्याच्या विकासात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे,” असे ते म्हणाले. शिक्षण, उद्योग, शेती आणि सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात अग्रस्थान मिळवले असल्याचे सांगत, ही प्रगती कायम राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्य अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

घरबसल्या ‘स्व-जनगणना’ला नागरिकांचा प्रतिसाद; अचूक माहितीमुळे विकास नियोजनाला गतीनागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा : तहसीलदार चंद्रकांत शेळके
जनगणना 2027 प्रशिक्षणाला वेग; वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रत्यक्ष पाहणी; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन
खा.अशोक चव्हाण यांनी केली स्वगणना; नागरिकांना सहभागाचे आवाहन
Ashutosh Kale (@ashutoshakale) • Instagram photos and videos

कोपरगाव : देशातील १६ वी जनगणना १ मेपासून सुरू होत असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. नागरिकांनी या जनगणना प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपली माहिती अचूकपणे नोंदवावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

जनगणना प्रक्रियेबाबत माहिती देताना आ. काळे म्हणाले, प्रारंभी घरगणना होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना केली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात ‘स्वगणना’ ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून नागरिकांना अधिकृत पोर्टलवर मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या स्वतःची माहिती भरता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी आपली माहिती अचूक भरावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. “महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून तो आपल्या एकतेचा, परिश्रमाचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे. संतांची, शूरवीरांची आणि कष्टकरी जनतेची ही भूमी असून राज्याच्या विकासात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

शिक्षण, उद्योग, शेती आणि सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात अग्रस्थान मिळवले असल्याचे सांगत, ही प्रगती कायम राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्य अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

COMMENTS