विरार : विरार रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी प्रवाशांनी अचानक आंदोलन छेडत स्थानिक रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प केली. सकाळी 8:28 वाजताची विरार-च

विरार : विरार रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी प्रवाशांनी अचानक आंदोलन छेडत स्थानिक रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प केली. सकाळी 8:28 वाजताची विरार-चर्चगेट लोकल गाडी वातानुकूलित स्वरूपात रूपांतरित केल्याच्या निर्णयाविरोधात संतप्त प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांनी गाडी पुढे जाऊ दिली नाही. या घटनेमुळे काही वेळासाठी स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम रेल्वे प्रशासनाने 1 मेपासून सकाळी 8:28 वाजताची विरार-चर्चगेट ही लोकल गाडी वातानुकूलित स्वरूपात चालवली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, या निर्णयाचा मोठा फटका रोजच्या प्रवाशांना बसत आहे.

COMMENTS