Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

शुभ्रा रंजनचे अपहरण करत उकळली खंडणी; तब्बल 1 कोटी 89 लाखाची उकळली खंडणी; आरोपी निघाला विद्यार्थीच

नवी दिल्ली : गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षिका शुभ्रा रंजन यांच्या अपहरण करून त

संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई
ऑपरेशन क्रॅकडाउनची धडक कारवाई : इस्लापूर परिसरात अवैध दारूवर मोठा प्रहार
एमएसईबी सबस्टेशनवरील जबरी चोरी उघड; तिघे जेरबंद, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
IAS कोचिंग डायरेक्टर शुभ्रा रंजन किडनैप: पूर्व छात्र ने दो दिन बंधक बनाकर  रखा; 2 करोड़ रुपए ऐंठे - Haribhoomi

नवी दिल्ली : गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध शिक्षिका शुभ्रा रंजन यांच्या अपहरण करून त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 89 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कटाचा सूत्रधार त्यांचाच माजी विद्यार्थी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भोपाळ येथे घडलेल्या या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत वळवलेली संपूर्ण रक्कम जप्त केली असून ती परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. माहितीनुसार, प्रियंक शर्मा नावाच्या तरुणाने सेमिनार व नवीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवून शुभ्रा रंजन यांना भोपाळला बोलावले. सुरुवातीला त्यांना एका आलिशान निवासस्थानी थांबवण्यात आले. त्यानंतर त्यांना दुसर्‍या ठिकाणी नेऊन बंदिस्त ठेवण्यात आले. आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत दोन दिवस त्यांना कैद करून ठेवले. या काळात त्यांना धमकावत विविध खात्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने 1 कोटी 89 लाख रुपये पाठवण्यास भाग पाडले.
तपासादरम्यान अनेक चकित करणार्‍या बाबी समोर आल्या. पीडितेला घाबरवण्यासाठी आरोपींनी बनावट अपहरणाचा दृश्यफीत तयार केला होता. आवाज बाहेर जाऊ नये म्हणून खोलीत धार्मिक कार्यक्रमही आयोजित केला होता. यासाठी बाहेरील भागातून गुन्हेगार बोलावण्यात आले होते. मुख्य आरोपीने अटक टाळण्यासाठी आजारी असल्याचे नाटक करत रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तिथूनच ताब्यात घेतले. प्रियंक शर्मा हा पूर्वी शुभ्रा रंजन यांच्याकडे शिक्षण घेत होता. त्यामुळे त्याला संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. गुन्हा करून परदेशात पळून जाण्याचा त्याचा डाव होता. या प्रकरणात त्याच्या कुटुंबीयांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे मोठ्या आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS