Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तथागतांच्या प्रज्ञा,शील,करुणा, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोना शिवाय जगाला पर्याय नाही-विनोद मुळूक

बीड : आज जगात सर्वत्र अशांतता व काही ठिकाणी युद्ध सुरू आहेत. पृथ्वीतलावर मानवप्राणी अतिउच्च उत्क्रांतीत आहे परंतु मानवता व वैज्ञानिक शोधाचा  योग्

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा
मराठा उपसमिती बरखास्त करा : मनोज जरांगे
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

बीड : आज जगात सर्वत्र अशांतता व काही ठिकाणी युद्ध सुरू आहेत. पृथ्वीतलावर मानवप्राणी अतिउच्च उत्क्रांतीत आहे परंतु मानवता व वैज्ञानिक शोधाचा  योग्य वापर न करता एकमेकांशी द्वेष भावना ठेवून आचरण केले जाते व अणुशास्त्र सज्जतेच्या जोरावर एक दिवस मानवाकडून मानवाचा नाश होऊ शकतो. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत हे तथागतांनी 2500 वर्षांपूर्वी सर्वांना सांगितले म्हणून तथागतांच्या प्रज्ञा,शील,करूणा, मैत्री व वैज्ञानिक दृष्टिकोना शिवाय जगाला पर्याय नाही. आज जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. असे प्रतिपादन बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोदजी मुळूक यांनी केले. धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर,पालवण रोड बीड येथे तथागतांची 2570 वी जयंती व विहार लोकार्पणाचा प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड न. प.चे उपाध्यक्ष माननीय विनोदजी मुळूक व वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी.वानखेडे उपस्थित होते. याप्रसंगी विचार मंचावर दिलीप गवळी ,विशाल वडमारे, निवृत्ती वाघमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड. तेजस वडमारे यांनी करून आपल्या प्रस्ताविकात 2569 व्या बुद्ध जयंती दिनी लोकार्पण झालेल्या ह्या विहारात दर पौर्णिमा, दर रविवारी साप्ताहिक बुद्ध वंदना, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ , सम्राट अशोक,छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले अशा सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या व महामातांच्या जयंती व स्मृतिदिन आणि राष्ट्रीय दिन साजरे करून प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात. हे विहार पूर्णत्वास जाण्याकरिता माननीय विनोद जी मुळुक यांचे जे मोलाचे सहकार्य लाभले ते असेच सहकार्य पुढे राहावे अशी कळकळीची विनंती व अपेक्षा व्यक्त करून त्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डी.जी वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की तथागतांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती देऊन तथागतांचे तत्वज्ञान, धम्मपद केवळ वाचण्याकरता नाही तर त्रिशरण, पंचशील,आर्य अष्टांगिक मार्ग व 10पारमीताचेआपल्या जीवनात पालन करणे व तसे वर्तन करणे कसे गरजेचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. अध्यक्षीय समारोपात आयु जी.एम भोले यांनी सांगितले की आज त्रिवेणी संगम आहे.तीन व पाच या अंकाला तथागतांच्या उपदेशात खूप महत्त्व आहे आज त्रिवेणी संगम आहे म्हणेज  1 मे बुद्ध जयंती,1 मे कामगार दिन,  1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन होय तर पाच गोष्टींचा योग म्हणेज  याच पौर्णिमेला सिद्धार्थांचा जन्म, सिद्धार्थांचा विवाह, सिद्धार्थांना गया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली झालेली दिव्य ज्ञानप्राप्ती, तथागतांचे कुशीनगर येथे झालेले महापरिनिर्वाण व याच पौर्णिमेला 2569 व्या बुद्ध जयंतीदिनी 2025च्या वैशाख पौर्णिमेला धम्मदीप बुद्धविहाराचे लोकार्पण पूज्य भंते धम्मशील थेरो यांच्या त्रिसरण पंचशील व देसनेने लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता. असा योगायोग फार क्वचित येतो या विहारात येऊन परिसरातील बालक – बालकांनी तसेच उपासक-उपासिका यांनी तथागतांच्या महान तत्वाला समजावून घेऊन आपल्या जीवनात आचरण करावे व आपल्या मुलांवर सुसंस्कार करावेत कारण विहारे ही संस्कार केंद्र व्हावयास पाहिजेत. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले,अद्या शिक्षिका सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाशिवाय प्रगती नाही शिक्षण हेच प्रगतीचा व उन्नतीचा मार्ग आहे. तरी महामानव अभिवादन ग्रुप लवकरच 6 वा मोफत शिकवणी वर्ग धम्मदीप बुद्ध विहारात या परिसरातील लहान बालकांसाठी सुरू करणार आहे असे जाहीर केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अंजली तेजस वडमारे व सरिता गौतम खेमाडे व महिला मंडळांनी बहुमोल परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गौतम खेमाडे, सचिन खेमाडे मोहन गवई ,देविदास भालेराव, सेनापती वडमारे, अंकुश जाधव, विशाल सोनवणे, सरिता खेमाडे आशा धनवे अर्चना जाधव छाया जोगदंड आरती जोगदंड, मीनाक्षी गवई, मालन अंकुटे, हौसाबाई वाघमारे, हेमा वाडमारे, सविता डोळस, किरण वडमारे,आशाबाई भालेराव, जयश्री गवळी, स्वाती वडमारे, शकुंतला ससाने, वर्षा खेमाडे, संगीता जाधव,दिपाली जाधव, पंचफुला वाघमारे, हर्षदा ताई, प्रीती जाधव,साधना खेमाडे, आर्यन खेमाडे,आदर्श खेमाडे व परिसरातील बालक बालिका उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन अंजली वडमारे यांनी केले .धम्मदीप बुद्ध विहार महिला मंडळाकडून खीरदान करण्यात आले व सरणातय कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS