Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम

शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा येथे रविवार, 3 मे रोजी पहाटे नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरे

पुण्यात पोर्टलवरून ड्रग्ज तस्करी; शिरूरमध्ये तिघे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा!
गोरेगावमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन तरूणांचा मृत्यू

शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा येथे रविवार, 3 मे रोजी पहाटे नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लॅश आउट’ अंतर्गत अवैध व्यवसायांवर अभूतपूर्व मास रेड कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध हातभट्टी दारू, रसायन मिश्रित शिंदी आणि गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
भल्या पहाटे सुरू झालेली ही कारवाई दुपारपर्यंत अखंड सुरू होती.अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईसाठी तब्बल 10 पोलिस अधिकारी आणि 105 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी हजारो लिटर रसायन मिश्रित अवैध हातभट्टी दारू व शिंदी जप्त करून तत्काळ नष्ट केली. तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले मोहफुलाचे शेकडो पोते जप्त करण्यात आले. हा साठा इतका मोठा होता की जवळपास दोन ट्रॅक्टरभर मोहफुले पोलिसांनी जप्त केली. यावरून या अवैध व्यवसायाचा मोठा विस्तार स्पष्ट झाला आहे. याशिवाय रसायन मिश्रित शिंदी तयार करून विक्री करणा-यांवर तसेच गुटखा विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एका गुटखा तस्करास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात अंदाजे 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या अचानक झालेल्या कारवाईमुळे शिवणी व तांडा परिसरात जिकडे पाहावे तिकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत होता. संपूर्ण परिसर पोलिस छावणीत रुपांतरित झाल्याचे चित्र होते. दरम्यान, शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून ही कारवाई पाहिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई प्रथमच होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बातमी लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच होती. पुढील काळात अशा अवैध हातभट्टी दारू व शिंदी व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशाच धडक मोहिमा राबवण्यात येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे अवैध व्यवसायांवर मोठा आळा बसेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. तसेच अशा ठोस कारवायांमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ‘इस्लापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या शिवणी तांडा व परिसरात सुरू असलेल्या रसायन मिश्रित हातभट्टी दारू,शिंदी व गुटखा तस्करी विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.अवैध व जीवघेणा व्यवसाय थांबवण्यासाठी पोलिस विभाग कटिबद्ध असून, अशा गैरकृत्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे,” असे अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सांगितले. सदरील कारवाई ही नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आगदी सूक्ष्म पद्धतीचे नियोजन लावून अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आली.या साठी इस्लापूर पोलिस ठाण्याचे सपोनी उमेश भोसले व त्यांची सर्व टीम होती तर हिमायातनगर येथील पोलिस निरीक्षक अमोल भगत,सापोनी वाठोरे,पोलिस उपनिरीक्षक शेख अजमोद्दीन,संजय कुमार पवार,भालेराव,जाधव,जगन्नाथ जाधव सतीश बनसोडे,भाऊसाहेब सोनकांबळे सह इस्लापूर,भोकर,हिमायतनगर,धर्माबाद,उमरी,वजिराबाद,भाग्यनगर,शिवाजीनगर,इतवारा, नांदेड विमानतळ येथील पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी हे कारवाई यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मागील अनेक वर्षापासून शिवणी इस्लापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रसायन मिश्रित हातभट्टी दारू आणि जीवघेणा ड्रग्स टाकून बनवलेलं रसायन युक्त शिंदी भर रस्त्यावर शाळा मंदिर व मुख्य गावात विक्री केले जाते.या कडे राज्य उत्पादन शुल्क जाणीव पूर्वक झोपेचा सोंग घेत आहे.ख-या अर्थाने ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क करायला पाहिजे.परंतु शेवटी ही कारवाई नांदेड पोलिसांना करावे लागले.तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाने या अवैध धंद्यावाल्या सोबत हातमिळवणी केली की काय अशी सुधा चर्चा रंगू लागली आहे.

COMMENTS