बीड : मिल्लिया महाविद्यालयात दिनांक 01 मे 2026 शुक्रवार रोजी महाराष्ट्रदिन व कामगारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार

बीड : मिल्लिया महाविद्यालयात दिनांक 01 मे 2026 शुक्रवार रोजी महाराष्ट्रदिन व कामगारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फैसल चाऊस यांच्या शुभहस्ते सकाळी 07:10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस, उपमुख्याध्यापक अल्हाज सिद्दिकी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेरखान, प्रा.जावेद पाशा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा.शोएब पिरजादे,डॉ.शामल जाधव, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. वेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे यांनी प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. तसेच शारीरिक शिक्षक अन्वर मसरुर यांनी सर्वांना साक्षरतेची शपथ दिली.

COMMENTS