अंबाजोगाई : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केज मत

अंबाजोगाई : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केज मतदारसंघाच्या आमदार मा. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या नव्या कार्यालयामुळे अंबाजोगाई परिसरातील नागरिकांना दस्त नोंदणी, जमिनीचे व्यवहार व इतर प्रशासकीय कामांसाठी होणारी गैरसोय दूर होणार असून, सेवा अधिक जलद व सुलभ होणार आहे. कार्यक्रमावेळी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वामी साहेब तसेच महसूल व बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. लोकार्पणानंतर बोलताना आमदार नमिताताई मुंदडा म्हणाल्या, अंबाजोगाईतील नागरिकांना सुसज्ज व आधुनिक कार्यालयाची गरज होती. ही मागणी पूर्ण झाल्याचा आनंद आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गती आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली, तर तहसीलदार विलास तरंगे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्वामी साहेब यांनी इमारतीच्या रचनेविषयी व उपलब्ध सुविधांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास अंबाजोगाई पंचक्रोशीतील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कार्यालय कार्यान्वित झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले, तर सब-रजिस्ट्रार दहिवाळ साहेब यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

COMMENTS