Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशरफ पटेल प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्नरक्तदान हेच खरे जीवनदान: सहाल चाऊस

माजलगाव : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या औचित्य साधून अशरफ पटेल प्रतिष्ठान व उमर हॉस्पिटल, माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्

बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे यावे – एस.एम. युसूफ
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे यावे-एस.एम.युसूफ
भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम मानवतेचा जिवंत संदेश-सुनील राणे

माजलगाव : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या औचित्य साधून अशरफ पटेल प्रतिष्ठान व उमर हॉस्पिटल, माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संपन्न झाले.
ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर व सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे, तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामीण रुग्णालय, माजलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सामाजिक कार्यकर्ते , अ‍ॅड. दीपक देशमुख, प्राचार्य शेख अन्वर, डॉ. महेश कोळपकर, मुफ़्ती शब्बीर अहमद, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माजलगाव नगरी चे उप नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हेच खरे जीवनदान असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्य, मानवता आणि सामाजिक जाणीव वाढीस लागते, असेही त्यांनी नमूद केले. या शिबिरात एकूण 70 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले असून 70 बॅग रक्त संकलित करण्यात आल्या यामध्ये महिलांनी 20 बॅग रक्तदान केल्या. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आणि त्या माजलगाव ब्लड बँकेला येथे जमा करण्यात आल्या. रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी, नोंदणी व रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली सुरक्षितरीत्या पार पडली. रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व अल्पोपहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी काटेकोर नियोजन केले होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापन सांभाळले. रक्तदात्यांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता व वैद्यकीय सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष शेख मुनीर अ. पटेल, उपाध्यक्ष डॉ. शेख अनिस अ. पटेल, सचिव डॉ. शेख अन्वर अ. पटेल, कोषाध्यक्ष रेशमा अ. पटेल तसेच सदस्य शेख सादेक य. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक व सहभागी नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
————

COMMENTS