Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्तार वेल्फेअर ट्रस्टतर्फे परभणी जिल्हा शाखेची स्थापनानवीन कार्यकारिणी जाहीर; पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

बीड: अत्तार वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बै

तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनमध्ये ‘नारी शक्ती कौशल्य अभियान’ संपन्न;महिलांच्या घटनात्मक अधिकार व करिअर संधींबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता
शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
महाराष्ट्र दिनापासून मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाची तयारी; आज जामा मस्जिद येथे महत्त्वाचा मशवेरा

बीड: अत्तार वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अधिकृतपणे परभणी जिल्हा शाखेची स्थापना जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. विविध पदांवर पुढीलप्रमाणे जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या: अध्यक्ष: सय्यद रऊफ सय्यद युनूस अत्तार, कार्याध्यक्ष: सय्यद अल्ताफ सय्यद हबीब, सचिव: अब्दुल खिजर अब्दुल जावेद, उपाध्यक्ष: सय्यद अलीम सय्यद खैरुद्दीन, उपसचिव: शेख एजाज शेख मुनीर, सदस्य: अझहर खान शेर खान, शेख हिसामुद्दीन इब्राहिमुद्दीन आदी बैठकीदरम्यान अत्तार वेल्फेअर ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी अकबर अत्तार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परभणी जिल्हा शाखेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी उपक्रमांना गती देणे तसेच नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे सेवा पोहोचवणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या पदाधिकार्‍यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मोहम्मद हनीफ साहब अत्तार, सय्यद जूनेद अत्तार, सय्यद मुनीर साहब अत्तार, सय्यद निसार शेख सलीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाजहितासाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.  नवीन परभणी जिल्हा अध्यक्ष सय्यद रऊफ सय्यद युनूस यांनी संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS