जामखेड : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व नागरिकांच्या सोयीसाठी आखलेल्या सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘प्रत्येक पाऊल विकासाकडे, शहराच्या प्रगतीकडे’ हे ब्रीद घेऊन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व नगरपरिषदेने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. या विकास कामाचा शुभारंभ जामखेडच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष पोपट दाजीराम राळेभात आणि मुख्याधिकारी अजय महादेव साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून खालील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये डोकेवस्ती रस्ता, पन्हाळकर घर ते जुना शिरूर रोड रस्ता, संताजीनगर ते मराठी शाळा दरम्यान स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन, शांतीनाथ महाराज सेवाश्रम येथे मंदिर बांधकाम, मारुती मंदिर (पोकळेवस्ती) येथे सभामंडप आणि अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह बांधकाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (चुंबळी) येथे नवीन वर्ग खोलीचे बांधकाम.भूमिपूजनासोबतच चुंबळी येथील पूर्ण झालेल्या विकासकामांचेही लोकार्पण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जि.प. शाळा ते घायतडक यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण आणि श्री हनुमान मंदिर सभामंडपाचा समावेश आहे. यावेळी जामखेड नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या माध्यमातून जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सूरू केले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

जामखेड : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व नागरिकांच्या सोयीसाठी आखलेल्या सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘प्रत्येक पाऊल विकासाकडे, शहराच्या प्रगतीकडे’ हे ब्रीद घेऊन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व नगरपरिषदेने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.
या विकास कामाचा शुभारंभ जामखेडच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष पोपट दाजीराम राळेभात आणि मुख्याधिकारी अजय महादेव साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून खालील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये डोकेवस्ती रस्ता, पन्हाळकर घर ते जुना शिरूर रोड रस्ता, संताजीनगर ते मराठी शाळा दरम्यान स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन, शांतीनाथ महाराज सेवाश्रम येथे मंदिर बांधकाम, मारुती मंदिर (पोकळेवस्ती) येथे सभामंडप आणि अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह बांधकाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (चुंबळी) येथे नवीन वर्ग खोलीचे बांधकाम.भूमिपूजनासोबतच चुंबळी येथील पूर्ण झालेल्या विकासकामांचेही लोकार्पण करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने जि.प. शाळा ते घायतडक यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण आणि श्री हनुमान मंदिर सभामंडपाचा समावेश आहे. यावेळी जामखेड नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या माध्यमातून जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सूरू केले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

COMMENTS