Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील केमिकल कंपनीत भीषण गॅस गळती; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास, अग्निशमन दलाचे जवानही बाधित!

https://www.youtube.com/watch?v=q7JjIj_pofI पुणे शहरातून मध्यरात्री एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगाधाम चौक परिसरात एका केम

गोव्यातील मंड्रेम बीच परिसरात तीन कॉटेजला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
ठाण्यात शिवशाही बस जळून खाक;15 प्रवासी थोडक्यात बचावले, प्रवाशांत भीतीचे वातावरण
भोकर तालुक्यातील शिंगरवाडी येथील शेतातील गोठ्यास आग; शेती साहित्य व औजारे जळून खाक

पुणे शहरातून मध्यरात्री एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगाधाम चौक परिसरात एका केमिकल कंपनीत गॅस गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली असून, तब्बल २४ नागरिकांना याचा फटका बसला आहे.
पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका केमिकल कंपनीतील टाकीतून अचानक गॅस गळती सुरू झाली. पाहता पाहता हा गॅस परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या विषारी गॅसमुळे परिसरातील २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS