Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वर्चस्व

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पार पडलेल्या धोत्रे व दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन्हीही सदस्य आमदार आशुतोष काळे गटाचेच निवडून आले. यापूर्वी तीन पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे एकूण पाच सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत चार सदस्य काळे गटाचे निवडून आल्यामुळे या पोटनिवडणुकीत काळे गटाचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले.  कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर, चांदेकसारे, धोत्रे आणि दहिगाव बोलके या चार ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण पाच जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु शिंगणापूर, चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे चांदेकसारे पोटनिवडणुकीत काळे गटाचे अमोल विठ्ठल माळी व शिंगणापूर पोटनिवडणुकीत काळे गटाच्या सौ.मोनाली साईनाथ जाधव यांची बिनविरोध निवड होवून काळे गटाचे दोन उमेदवार तर कोल्हे गटाचा शिंगणापूरमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता.  उर्वरित धोत्रे आणि दहिगाव बोलका या दोन ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) रोजी पार पडली. धोत्रे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माया किरण माळवदे व दहिगाव बोलका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुमती नानासाहेब डोंगरे हे काळे गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले.  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे माजी आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आ. काळे यांनी दिलेली गावाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल विठ्ठल माळी,  मोनाली साईनाथ जाधव,  माया किरण माळवदे व अनुमती नानासाहेब डोंगरे यांनी स्पष्ट केले.

गौतम पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश प्रक्रिया संपन्न
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ; ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली; प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पार पडलेल्या धोत्रे व दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन्हीही सदस्य आमदार आशुतोष काळे गटाचेच निवडून आले. यापूर्वी तीन पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे एकूण पाच सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत चार सदस्य काळे गटाचे निवडून आल्यामुळे या पोटनिवडणुकीत काळे गटाचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले.

 कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर, चांदेकसारे, धोत्रे आणि दहिगाव बोलके या चार ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण पाच जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु शिंगणापूर, चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे चांदेकसारे पोटनिवडणुकीत काळे गटाचे अमोल विठ्ठल माळी व शिंगणापूर पोटनिवडणुकीत काळे गटाच्या सौ.मोनाली साईनाथ जाधव यांची बिनविरोध निवड होवून काळे गटाचे दोन उमेदवार तर कोल्हे गटाचा शिंगणापूरमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता.

 उर्वरित धोत्रे आणि दहिगाव बोलका या दोन ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार (दि.२८) रोजी पार पडली. धोत्रे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माया किरण माळवदे व दहिगाव बोलका ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुमती नानासाहेब डोंगरे हे काळे गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले.

 नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे माजी आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आ. काळे यांनी दिलेली गावाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल विठ्ठल माळी,  मोनाली साईनाथ जाधव,  माया किरण माळवदे व अनुमती नानासाहेब डोंगरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS