Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीकडून महिलादिन उत्साहात

कोपरगाव तालुका ः राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी च्या वतीने कोपरगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर व महिलांकरिता विविध क

सिव्हीलच्या दारात उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू
पेट्रोल -डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू
महात्मा फुलेंनी वंचित घटकाला न्याय देण्याचे काम केले: प्रतापराव ढाकणे

कोपरगाव तालुका ः राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी च्या वतीने कोपरगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर व महिलांकरिता विविध क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत सुनियोजित ह्या कार्यक्रमाचे आयोजन  राज्य कार्य सदस्या सौ स्नेहा दिलीप कानडे, महिला शहर अध्यक्ष सौ जयश्री गणेश कानडे यांनी केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप  व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बीसुरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हाध्यक्ष अशोक कानडे, शहर अध्यक्ष गणेश कानडे यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरित्या झाले.
राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहर चर्मकार महिला आघाडी आणि एसजेएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्तरक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी समाजातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.सदर कार्यक्रमास समाजातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तसेच बांधवांनी रक्तदान करुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा संदेश दिला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वंदना झरेकर यांनी केले. यावेळी एम डी कानडे, संजय पोटे, तालुका अध्यक्ष माधवराव पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग, संतोष शिंदे, भाऊसाहेब कानडे, माधव पोटे पोलीस, संकेत दिलीप कानडे, संकेत अनिल कानडे, गणेश आण्णासाहेब कानडे, प्रमोद भोसले, डॉ अशोक गावीत्रे, ग्रामसेवक बागले भाऊसाहेब, रघुनाथ लोहकरे, कचरू लोहकरे, शंकर कडू, जगन कानडे, मनोज कानडे, भैय्या कानडे, तेजस विजय अहिरे, ओम कानडे तसेच महिला आघाडीच्या शोभा कानडे, शोभा पोटे, चंद्रकला कानडे, सविता पोटे, लिला पोटे, कविता गाढे, उषा लोहकरे, सुमन सातपुते, संगीता कानडे, सोनाली कानडे, सुलेखा पोटे, अर्चना कानडे, प्रतिभा भोसले, राणी सातपुते, समुन सातपुते, सुनिता कानडे, मोनिका दुशिंग, सरला पोटे, धनश्री पाठक, नलिनी विठ्ठल तुपे, सायली तुपे, कविता गाडे, प्राजक्ता गाडे, अनुराधा कानडे, निलम अशोक गायत्रे, पुजा जाधव, सुमन साटवते, प्रतिक्षा गाढे, स्वाती सातपुते, पुनम चोळके, ऋतुजा कानडे, साईश्री कानडे, साईश्री पोटे, अक्षरा कानडे, श्रृतिका कानडे, यांचे सह पदाधिकारी व समाज बांधव व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS