Homeताज्या बातम्याअहमदनगर

शिक्षक की सुपरमॅन? अशैक्षणिक कामांचा भारअध्यापनावर परिणाम; शिक्षक संघटनांची नाराजी

देवळाली प्रवरा : महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचा कणा मानला जाणारा शिक्षक आज आपल्या मूळ भूमिकेपासून दूर ढकलला जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. “मी आहे शिक्षक, पण बनवलंय सुपरमॅन!” ही भावना केवळ उद्गार नसून सध्याच्या व्यवस्थेतील विसंगतीचे स्पष्ट चित्र असल्याचे मत व्यक्त होत आहे.शिक्षकाचे मुख्य कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्या बौद्धिक, नैतिक व सामाजिक विकासाला दिशा देणे. मात्र प्रत्यक्षात शिक्षकांचा मोठा वेळ वर्गखोल्यांऐवजी विविध प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांमध्ये खर्च होत आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी दुरुस्ती, जनगणना, शासकीय सर्वेक्षणे आणि विविध योजनांची अंमलबजावणी यांचा वाढता भार शिक्षकांवर टाकला जात असल्याची तक्रार आहे.यामुळे अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील सजीवपणा कमी होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. सततच्या अतिरिक्त कामामुळे शिक्षकांमध्ये मानसिक ताण वाढत असून त्यांच्या सर्जनशीलतेवरही मर्यादा येत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्गदर्शन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.शिक्षक संघटनांकडून यावर उपाय म्हणून अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनिक कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमल्यास शिक्षकांना अध्यापनावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तज्ज्ञांच्या मते, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा स्पष्ट मर्यादित आराखडा तयार करणे, डिजिटल प्रणाली सुलभ करणे, शाळा पातळीवर सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि शिक्षकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’२४ तास ऑन ड्युटी’ ही अपेक्षा अवास्तव“२४ तास ऑन ड्युटी” ही अपेक्षा अवास्तव असून शिक्षक हा यंत्र नसून समाज घडवणारा संवेदनशील घटक आहे, याची जाणीव प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे. शिक्षणव्यवस्थेतील खरा बदल हा धोरणांपेक्षा वर्गखोल्यांमध्ये घडतो. त्यामुळे शिक्षकांना ‘सुपरमॅन’ बनवण्याऐवजी त्यांना त्यांच्या मूळ भूमिकेत कार्य करू देणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळखमहंत उद्धव महाराज मंडलिक ; देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेची सांगता
आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

COMMENTS