बीड : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष’( एएचटीयू) कडून आक्रमक कारवाई सुरू असून, मागील एकाच आठवड्यात बी

बीड : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष’( एएचटीयू) कडून आक्रमक कारवाई सुरू असून, मागील एकाच आठवड्यात बीड पोलिसांनी तीन बालविवाह उधळून लावत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बालविवाहाला प्रोत्साहन देणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. 26 एप्रिल 2026 रोजी बीड तालुक्यातील दहीफळ येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह इरफान बेग (वय 24) याच्याशी लावला जात असल्याची गुप्त माहिती -कढणच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंडपात मोठी गर्दी असल्याने दोन महिला पोलीस कर्मचार्यांनी वेषांतर करून प्रवेश केला आणि अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत विवाह थांबवला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या कलम 9, 10 व 11 अंतर्गत नवरदेव, मुलीचे आई-वडील, नातेवाईकांसह सुमारे 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर 15 ते 20 वर्हाडींचाही तपास सुरू आहे. दहीफळ येथील कारवाईनंतर त्याच दिवशी केज तालुक्यातील जोला येथेही बालविवाह रोखण्यात आला. या प्रकरणी नवरदेव श्रीकांत जाधव व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, 18 एप्रिल रोजी सोनगाव (ता. जि. बीड) येथे 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एएचटीय पथकाच्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांत जिल्ह्यात बालविवाहाचे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलींचे समुपदेशन करून त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येत असून पुढील संरक्षणाची उपाययोजना केली जात आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. बालविवाह रोखण्यासाठी आमचे पथक सतत सतर्क आहे, असे -कढण पथकाने सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झडख पल्लवी जाधव, मीरा रेडेकर, उषा चौरे, शोभा जाधव, प्रदीप येवले, अशोक शिंदे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS