Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प : जलसंपदा मंत्री विखे पाटील ; ‘गोदा ते नमर्दा’ जलयात्रेनिमित्त निर्धार

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईभूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे शिर्डीत आगमन झाले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रांचा शिर्डीत संगम झाला असून या यात्रांद्वारे जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या जलयात्रेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच अहिल्यादेवींच्या जन्मस्थळ चोंडी येथून यात्रेला प्रारंभ झाला. दोन्ही यात्रा शिर्डीत एकत्र येऊन सोमवारी मध्यप्रदेशकडे रवाना झाल्या. यात्रेदरम्यान राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलकलशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डीत आगमनानंतर मल्हारी मार्तंड मंदिरात पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून जलकलशांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या माध्यमातून जलसंवर्धन व जलव्यवस्थापनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.वडतुके, आ.गोपीचंद पडळकर, आ.सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदीरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले.शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला.  जलयात्रेतील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा व जलकलशाचा रथ हे विशेष आकर्षण ठरले. धनगर नृत्याने वातावरण रंगले, तर मंत्री विखे पाटील व आमदारांचा बसमधील सहभागही चर्चेचा विषय ठरला. यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा दिला. श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वर येथे लिहिल्याने शिर्डी आणि महेश्वर यांचे आध्यात्मिक नाते दृढ झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.  

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत ‘आत्मा मालिक’चा दबदबा
‘सर्वसामान्यांची फसवणूक-मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक पथदर्शक : अण्णा हजारे

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईभूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे शिर्डीत आगमन झाले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रांचा शिर्डीत संगम झाला असून या यात्रांद्वारे जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या जलयात्रेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच अहिल्यादेवींच्या जन्मस्थळ चोंडी येथून यात्रेला प्रारंभ झाला. दोन्ही यात्रा शिर्डीत एकत्र येऊन सोमवारी मध्यप्रदेशकडे रवाना झाल्या.

यात्रेदरम्यान राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलकलशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डीत आगमनानंतर मल्हारी मार्तंड मंदिरात पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून जलकलशांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या माध्यमातून जलसंवर्धन व जलव्यवस्थापनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.वडतुके, आ.गोपीचंद पडळकर, आ.सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदीरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले.शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला.

 जलयात्रेतील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा व जलकलशाचा रथ हे विशेष आकर्षण ठरले. धनगर नृत्याने वातावरण रंगले, तर मंत्री विखे पाटील व आमदारांचा बसमधील सहभागही चर्चेचा विषय ठरला.

यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा दिला. श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वर येथे लिहिल्याने शिर्डी आणि महेश्वर यांचे आध्यात्मिक नाते दृढ झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.  

COMMENTS