Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मायबापाची मान खाली जाईल असे वागू नका-हेडकॉन्स्टेबल श्रीमती जाधव

जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयाला दामिनी पथकाची भेट

गेवराई प्रतिनिधी - महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाचे दामिनी पथक सक्रिय आहे. त्यांची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थी विद्

प्रधानमंत्री जन-धन योजनेत 46 कोटींपेक्षा अधिक लाभधारक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने  पूर परिस्थीतीचे प्रशिक्षण
जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी – महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाचे दामिनी पथक सक्रिय आहे. त्यांची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थी विद्यार्थीनीनी शिस्तीत राहून शिक्षण घ्यावे. चुकीच्या मार्गाने जाऊन माय बापाची मान खाली जाईल असे वागू नका. देशाचे उत्तम नागरिक बना. कुणाला त्रास होत असेल तर दामिनी पथकाशी संपर्क साधा असे आवाहन बीड जिल्हा दामिनी पथकाच्या कॉन्स्टेबल श्रीमती जाधव यांनी केले. शिवाजीनगर गढी येथील जय भवानी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर गढी येथील जय भवानी कनिष्ठ महाविद्यालयाला बीड जिल्हा दामिनी पथकाने भेट दिली. यावेळी प्राचार्य वसंत राठोड, दामिनी पथकाच्या प्रमुख हेड कॉन्स्टेबल श्रीमती जाधव, श्रीमती बहिरवाल, श्री. पवार, प्राध्यापक आनंद बडवे प्रा. बंडू शेंबडे पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी विद्यार्थीनी कु. विश्रांती आहेर, कु. निकिता धुमाळ यांनी दामिनी पथकांच्या मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी श्रीमती जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शिस्तीत शिक्षण घ्यावे. आई वडिलांचे नाव मोठे करा, त्यांचा विश्वासघात करु नका. महिला आणि मुलींची छेड काढू नका, सोशल मिडीयाचा वापर जपून करा, चांगला नागरिक बना, करिअर वर लक्ष ठेवून चाला, वाईट गोष्टी करु नका. मुलींनी सुद्धा चांगले वागावे गैरप्रकारांना बळी पडू नये, कांही अडचण येत असेल तर दामीनी पथकांशी संपर्क साधा असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंत राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रा. सत्यप्रेम लगड यांनी मानले. यावेळी प्रा. गणेश पवळ, प्रा. हरी देवकर, प्रा. तनपुरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS