बीड : धर्मदाय निरीक्षक परीक्षेत एनटी-बी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार्या ओम गायकवाड यांचा कौटुंबिक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. य

बीड : धर्मदाय निरीक्षक परीक्षेत एनटी-बी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार्या ओम गायकवाड यांचा कौटुंबिक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (अजित पवार गट) बीड जिल्हाध्यक्ष तथा इंजिनिअर अजिंक्य आनेराव यांनी, ओम यांनी यावर न थांबता भविष्यात धर्मदाय आयुक्त पदाचे शिखर गाठावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ओम स्मिता संजय गायकवाड यांनी 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (चझडउ) सरळसेवा भरतीद्वारे धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत झालेल्या परीक्षेत यश संपादन केले. त्यांनी राज्यात ओपन प्रवर्गातून 94 वा क्रमांक तर एनटी-बी प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रल्हादराव गायकवाड (आजोबा), संजय गायकवाड (वडील), अजय गायकवाड (काका), स्मिता गायकवाड (आई), मिरा गायकवाड (काकू) तसेच पत्रकार रवी उबाळे उपस्थित होते. अजिंक्य आनेराव म्हणाले की, धर्मदाय निरीक्षक पद हे अत्यंत जबाबदारीचे असून या पदाद्वारे मंदिर ट्रस्ट, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओम यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. त्यांनी पुढील काळातही परिश्रम सुरू ठेवून धर्मदाय आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. कार्यक्रमास श्रीकांत आनेराव, सुशील उबाळे, सुनील उबाळे, किरण उबाळे, मुकुंद आनेराव, सुमित रायसोनी, मनोज पवार, प्रशांत देशपांडे, कैलास जोगदंड, अजय मस्के, सचिन शिंदे, विनायक आनेराव, अशोक गेंदले, ज्ञानेश्वर आनेराव, प्रकाश सूर्यवंशी, विठ्ठल खरसारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीष जाडे यांनी केले, प्रास्ताविक अपूर्वा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्रुती गायकवाड यांनी केले.
लवकरच मिळणार नियुक्ती
धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा 2025-26 चा निकाल 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला असून ओम गायकवाड यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. 23 एप्रिल 2026 रोजी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची धर्मदाय निरीक्षक पदावर लवकरच नियुक्ती होणार आहे.

COMMENTS