Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निष्ठावंत अनिल दादा जगताप यांना विधान परिषदेची संधी द्यावी – प्रदीप माने पाटील

बीड : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे आणि संसदीय नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधान परिषद नि

नांदेड विधान परिषद मतदारसंघासाठी हालचालींना वेग; बदललेल्या राजकीय समीकरणांत रंगणार नवी लढत
कल्याणकरांविरोधातील कारस्थानांचा पर्दाफाश होणार?शिवसेना नेतृत्वाने निष्ठावंतांना न्याय द्यावा; फंदफितुरी करणार्‍यांवर कारवाईची मागणी
विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?

बीड : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे आणि संसदीय नेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून किमान एक जागा बीड जिल्ह्यासाठी राखीव ठेवून, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना बीड विधानसभा संघटक प्रदीप माने पाटील यांनी केली आहे.
अनिल दादा जगताप यांनी शिवसेनेत दीर्घकाळ निष्ठेने काम करत संघटन बांधणी मजबूत केली असून, जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकत्र ठेवत पक्षवाढीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची संधी देणे आवश्यक असल्याचे माने पाटील यांनी स्पष्ट केले. पूर्वी बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत ते वर्चस्व कमी झाले आहे. अशा परिस्थितीत निष्ठावंत आणि अनुभवी नेतृत्वाला संधी दिल्यास पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनिल दादा जगताप हे पक्षाशी एकनिष्ठ राहून सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांमधूनही जोर धरत आहे.

COMMENTS