कर्जत : कर्जत नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवीन राजकीय समीकरण पुन्हा एकदा तयार झाले आहे. गटनेतेपदावरून मोठा वाद उभा राहिला आहे. विद्यमान गटनेते तथा उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करत नऊ नगरसेवकांनी सतीश उद्धवराव पाटील यांची नवीन गटनेतेपदी निवड करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील सह्यांचे लेखी पत्र आज (दि. 24) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना सतीश पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 सदस्यीय गटाची विशेष बैठक आज सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. गटनेते संतोष मेहत्रे यांचे कामकाज घटनेनुसार होत नसल्याच्या कारणावरून त्यांना पदावरून दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस 11 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नऊ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र सादर केले. या पत्रात संतोष मेहत्रे यांना गटनेतेपदावरून हटवून सतीश पाटील यांची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाटील पुढे म्हणाले की, “आमच्या 15 सदस्यीय गटापैकी 11 नगरसेवक आमच्या बाजूने आहेत. लोकशाही पद्धतीत बहुमताला महत्त्व असते. संतोष मेहत्रे यांच्याकडे आता बहुमत नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तसेच मला पदावरून दूर करण्याचाही अधिकार त्यांच्याकडे उरलेला नाही.” आठ नगरसेवकांनी विरोधी मतदान केले किंवा मत नोंदवले तरीदेखील संतोष मेहत्रे यांना गटनेते या पदावर राहता येत नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे. आज नऊ नगरसेवकांनी मेहेत्रे यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केलेला आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे, अमृत काळदाते, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, ज्योती शेळके यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील वर्षभरापासून कर्जत नगरपंचायतीत सातत्याने राजकीय उलथापालथ सुरू असून या नव्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटनेतेपदाच्या या वादावर आता जिल्हाधिकाऱ्यांचा काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जत नगरपंचायतचे गटनेते म्हणून सतीश पाटील यांची निवड करण्याच्या मागणीचे पत्र नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

कर्जत : कर्जत नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवीन राजकीय समीकरण पुन्हा एकदा तयार झाले आहे. गटनेतेपदावरून मोठा वाद उभा राहिला आहे. विद्यमान गटनेते तथा उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करत नऊ नगरसेवकांनी सतीश उद्धवराव पाटील यांची नवीन गटनेतेपदी निवड करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील सह्यांचे लेखी पत्र आज (दि. 24) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना सतीश पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 सदस्यीय गटाची विशेष बैठक आज सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. गटनेते संतोष मेहत्रे यांचे कामकाज घटनेनुसार होत नसल्याच्या कारणावरून त्यांना पदावरून दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस 11 नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीनंतर सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नऊ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र सादर केले. या पत्रात संतोष मेहत्रे यांना गटनेतेपदावरून हटवून सतीश पाटील यांची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाटील पुढे म्हणाले की, “आमच्या 15 सदस्यीय गटापैकी 11 नगरसेवक आमच्या बाजूने आहेत. लोकशाही पद्धतीत बहुमताला महत्त्व असते. संतोष मेहत्रे यांच्याकडे आता बहुमत नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तसेच मला पदावरून दूर करण्याचाही अधिकार त्यांच्याकडे उरलेला नाही.” आठ नगरसेवकांनी विरोधी मतदान केले किंवा मत नोंदवले तरीदेखील संतोष मेहत्रे यांना गटनेते या पदावर राहता येत नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे. आज नऊ नगरसेवकांनी मेहेत्रे यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केलेला आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे, अमृत काळदाते, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, ज्योती शेळके यांचा समावेश आहे.
दरम्यान, मागील वर्षभरापासून कर्जत नगरपंचायतीत सातत्याने राजकीय उलथापालथ सुरू असून या नव्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटनेतेपदाच्या या वादावर आता जिल्हाधिकाऱ्यांचा काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जत नगरपंचायतचे गटनेते म्हणून सतीश पाटील यांची निवड करण्याच्या मागणीचे पत्र नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

COMMENTS