Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घसरगुंडी कोसळून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुणे : शहरातील हडपसर परिसरात निष्काळजीपणामुळे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंड

वेरूळ लेणीत मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला
जगावर ‘हंता’ व्हायरसचं संकट; क्रुझवर मृत्यूचा थरार! भारत अलर्ट मोडवर, १६५ प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू!
सूर्याच्या अग्निप्रकोपापासून सावध राहा; सतर्कता हाच जीव वाचविण्याचा मार्ग-डॉ. वैद्य
Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी  मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा - Pune Prime News

पुणे : शहरातील हडपसर परिसरात निष्काळजीपणामुळे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मगरपट्टा भागातील वेदविहार सोसायटीत घडली. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार) ही चिमुरडी इतर मुलांसोबत खेळत असताना, नीट बसवलेली नसलेली लोखंडी घसरगुंडी अचानक तिच्यावर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला, चेहर्‍याला आणि मानेला गंभीर मार लागला. घटनास्थळीच ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नसल्याची बाब त्यांनी यापूर्वी अनेक वेळा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ती हटवण्याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या; मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. या निष्काळजीपणामुळेच मुलीचा जीव गेला, असा आरोप करत वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर संबंधित पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घसरगुंडीच्या बसवणीतील त्रुटी, देखभालीतील दुर्लक्ष आणि जबाबदारी निश्‍चित करण्यावर भर दिला जात आहे.

COMMENTS