Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकुल लाभार्थ्यांच्या तांत्रिक त्रुटी तातडीने सोडवून हप्ते खात्यात जमा करा: सरपंच भागवत दराडे यांची मागणी

तालुक्यातील जैतापूर देवठाणा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पीएम आवास ग्रामीण घरकुल योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील लाभार्थ्यांच्या याद

बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम
संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक



तालुक्यातील जैतापूर देवठाणा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पीएम आवास ग्रामीण घरकुल योजना तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करून मंजूर घरकुल हप्ते थेट बँक खात्यात वर्ग करावेत, अशी मागणी सरपंच भागवत दराडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गावातील अनेक लाभार्थ्यांची नावे योजनेच्या मंजूर यादीत असूनही विविध तांत्रिक कारणांमुळे त्यांना हप्ते मिळालेले नाहीत. परिणामी संबंधित लाभार्थ्यांना वारंवार धारूर आणि बीड येथील कार्यालयांचे चकरा माराव्या लागत आहेत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांमध्ये दीपक बंडू दराडे, परमेश्वर तुकाराम चव्हाण, बालाजी किसनराव सहजराव, शरद बालासाहेब राठोड, विकास बळी राठोड, लहू कचरू राठोड, बायनाबाई गंपू राठोड, हिराजी गंपू चव्हाण यांसह अनेकांची नावे तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील राजाभाऊ कारभारी दराडे, सुनिता समाधान दराडे, वसंत लिंबाजी चव्हाण, ज्ञानेश्वर कचरू राठोड, शरद परसराम पवार, राजकुमार मच्छिंद्र दराडे, गोविंद आलू राठोड, अविनाश प्रभू राठोड, कुसाबाई महिपती दराडे, सुनील गणपत चव्हाण, तानाजी खिराजी चव्हाण, आत्माराम सर्जेराव दराडे, शिवराज बब्रुवान दराडे, गणेश राजाभाऊ दराडे आदी लाभार्थ्यांची नावे मंजूर यादीत असूनही हप्ते अडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना न्याय मिळून घरकुल योजनेचे हप्ते तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, अन्यथा ग्रामपंचायत स्तरावर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच भागवत दराडे यांनी दिला आहे.

COMMENTS