Homeताज्या बातम्याअहमदनगर

दिलेला शब्द पाळला! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आदिल शाह कुटुंबाला नवीन घरपहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राणार्पण; युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 21 एप्रिल 2026 रोजी झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना अद्वितीय शौर्य दाखवत बलिदान देणारे आदिल हुसैन शाह या

गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 



जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 21 एप्रिल 2026 रोजी झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना अद्वितीय शौर्य दाखवत बलिदान देणारे आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एज्ञपरींह डहळपवश यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला आहे.
शिंदे यांच्या पुढाकारातून शाह कुटुंबासाठी नवीन, सुसज्ज घर बांधून देण्यात आले असून त्या घराचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री योगेश कदम, कॅप्टन अभिजीत अडसूळ, युवासेना सचिव विकास गोगावले, अभिमन्यू खोतकर, काश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे तसेच अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमामध्ये युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास गेला. आदिल हुसैन शाह यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची आठवण जपत त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, या हेतूने उभारण्यात आलेले हे घर केवळ निवारा नसून मानवतेचा जिवंत संदेश देणारे प्रतीक ठरत आहे. या उपक्रमामुळे समाजात सहकार्य, संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना यांचा आदर्श निर्माण झाला असून, गरजूंसाठी पुढे येण्याची प्रेरणा या घटनेतून मिळत आहे.

COMMENTS