Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट येथे बेलदार (ओड) समाजाचा भव्य मेळावाआ. केराम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य बेलदार (ओड) भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साळुंखे हे किनवट दौर्‍यावर आले असता, त्यांनी समाज बांधवांशी प्रत्यक्ष संवाद

महावितरणचा ’स्मार्ट’ संताप: ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने मीटर, अन् अधिकार्‍यांच्या कानाला मात्र ’कुलूप’!
नगरपरिषदेचा ’काविळ’ की दुटप्पी न्याय?;अतिक्रमणांना अभय, मालकी हक्काच्या जागेला मात्र ’नोटीस’चा फास!
किनवटमध्ये ’विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ नावाच्या ऐतिहासिक डिजिटल फलकाचे अनावरण



महाराष्ट्र राज्य बेलदार (ओड) भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साळुंखे हे किनवट दौर्‍यावर आले असता, त्यांनी समाज बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. याप्रसंगी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.  भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेलदार (ओड) समाज, किनवट-माहूर तालुक्याच्या वतीने आ. भीमराव केराम आणि अध्यक्ष राजाभाऊ साळुंखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले ऐक्य प्रदर्शित केले. मेळाव्या दरम्यान समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण व रोजगार: समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, मूलभूत सोयी-सुविधा: समाजातील कुटुंबांसाठी हक्काची घरकुले, पिण्याचे पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवणे, शासकीय योजना: भटके-विमुक्त समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, तीर्थक्षेत्र विकास: सारखानी (किनवट) येथील आदिशक्ती कान्हूसतिमाता देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती करण्यात आली. समाजाच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आ.  केराम यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले की, बेलदार समाजाचे प्रश्न हे माझे स्वतःचे प्रश्न आहेत. शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच, समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि तीर्थक्षेत्राच्या दर्जासाठी हा विषय मी मंत्रिमंडळात मांडून त्याचा पाठपुरावा करेन.

COMMENTS