Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आ.केराम

माहूर : माहूर शहरातील जुन्या नगर पंचायत सभागृहात दि. 19 रोजी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशु

राजधानीत महात्मा फुले यांना अभिवादन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
बेलापूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम
जि.प. पाटेगाव शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; प्रेरणादायी उपक्रम

माहूर : माहूर शहरातील जुन्या नगर पंचायत सभागृहात दि. 19 रोजी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशुराम व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील प्रत्येकाने भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारावा, असे आवाहन आ. केराम यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात आ. केराम यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून करण्यात आली. यावेळी जन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यानंतर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आ. केराम यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच आ. केराम यांनी दत्तशिखर येथे पार पडलेल्या षोडशी कार्यक्रमात उपस्थित राहून दत्तशिखर संस्थानचे महंत प.पू. श्री 1008 डॉ. धनेश्वर उर्फ शाम भारती महाराज तसेच जुना आखाड्याचे महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज यांचे दर्शन घेतले. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष  गोपु महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, विजय आमले, नंदकुमार जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS