इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आता संपूर्ण जग आर्थिक संकटाच्या खाईत लोटलं गेलंय! जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या 'होर्मुझ खाडी'त ग

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आता संपूर्ण जग आर्थिक संकटाच्या खाईत लोटलं गेलंय! जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’त गेल्या ४८ तासांत तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा मार्गच बंद केल्याने जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींनी आकाश गाठलंय!
परिस्थिती इतकी बिघडली आहे की, होर्मुझ खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर थेट गोळीबार केला जातोय. अनेक देशांत ऊर्जेचं संकट निर्माण झालं असून जगाची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आली आहे. पण आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी जगातील ३० हून अधिक देश एकत्र आले आहेत!
महत्त्वाची बातमी म्हणजे, आज बुधवारी लंडनमध्ये ब्रिटनच्या नेतृत्वाखाली एक हाय-लेव्हल बैठक पार पडणार आहे. या मोहिमेचं नेतृत्व ब्रिटन आणि फ्रान्स करत असून, विशेष म्हणजे यातून अमेरिकेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलंय! युद्धाचा भाग असलेल्या देशांऐवजी, मार्ग सुरक्षित करू शकणाऱ्या ३० देशांना यात बोलावण्यात आलं आहे.
या ऐतिहासिक बैठकीसाठी भारतालाही निमंत्रण मिळालं आहे. जर्मनी, इटली, जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूएई सारखे देश एकत्र येऊन होर्मुझ खाडीतील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी प्लॅन तयार करत आहेत. अमेरिकेने मदतीसाठी साद घातली, पण एकही देश त्यांच्या मागे उभा राहिला नाही, हे विशेष!
आता लंडनमध्ये होणाऱ्या या बैठकीनंतर होर्मुझ खाडी पुन्हा सुरक्षित होणार का? तेलाचे दर कमी होणार का? आणि अमेरिका यावर काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS