Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 स्वामी समर्थ केंद्रास निधी मिळवून देण्यात आ. काळेंचे योगदान : आढाव

कोपरगाव : शहरातील सुबद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहासाठी निधी मिळवून देण्यात आमदार आशुतोष काळे यांचे मोठे योगदान आहे. मात्र ज

लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
अक्षय तृतीयेनिमित्त सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा; 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे वाटप
माहूरच्या रेणुकामातेला आम्रफळांची मनमोहक आरास

कोपरगाव : शहरातील सुबद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहासाठी निधी मिळवून देण्यात आमदार आशुतोष काळे यांचे मोठे योगदान आहे. मात्र ज्यांचा या निधीशी काडीचाही संबंध नाही त्यांनी श्रेय घेण्यासाठी रविवारी (दि.१९) अक्षयतृतीयेच्या दिवशी दमबाजीचा केलेला प्रकार श्री स्वामी भक्तांना व कोपरगावकरांना चिड आणणारा असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोमनाथ आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आढाव यांनी पुढे असे म्हटले आहे की, आ. काळे यांनी शहराच्या विकासासाठी आणि विशेषतः श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सोयीसुविधांसाठी जवळपास ४७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.  कोल्हे गट केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. आयत्या पिठावर रेघा ओढणे ही कोल्हे गटाची जुनीच नीती असून त्याची पुनरावृत्ती रविवार रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली आहे.

 कोल्हे गटाला जर भूमिपूजन आणि उद्घाटन करायची एवढीच हौस असेल तर त्यांनी श्री स्वामी भक्तांना आणि कोपरगावकरांना याचे उत्तर द्यावे की, त्यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्रांसाठी किती निधी दिला आणि कोणती विकासकामे केली याचा हिशोब स्वामी भक्तांना द्यावा असे आव्हान केले असून विकास कामांना निधी देणारे कधीही विकास कामांना विरोध करत नाही. मात्र ज्यांचा निधीशी काहीही संबंध नाही ते कांगावा करत आहे.

COMMENTS