Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनईत शेतातून कांदा व मोटार चोरी

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात शेतात अनधिकृत प्रवेश करून कांदा व पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने

‘सोमैया’च्या 20 विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत निवड
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
‘प्रवरा’तील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
sonai police

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात शेतात अनधिकृत प्रवेश करून कांदा व पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकाचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात सहा जणांसह अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकिशोर कचरुदास बंग (वय ६६, व्यवसाय शेती) यांच्या गट क्रमांक १३२/१ येथील शेतात १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आरोपींनी प्रवेश केला. यामध्ये सोमनाथ एकनाथ लष्करे, राहुल सोमनाथ कुसळकर, अजय केशव लष्करे, रमेश शेटीबा कुसळकर, विकास विठ्ठल कुसळकर यांच्यासह एक अनोळखी पुरुष व एक महिला यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी शेतातील सुमारे १२ हजार रुपये किमतीचा कांदा व पाण्याची मोटार जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. याशिवाय ट्रॅक्टरला रोटावेटर लावून कांदा पिकामध्ये फिरवून मोठे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMENTS