Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

क्रिकेटपटू आणि खा.युसूफ पठाण यांच्या सासर्‍याला आणि मेहुण्याला अटक

मुंबई : भायखळा परिसरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाने अचानक उग्र रूप धारण करत मारहाणीपर्यंत मजल मारली. या प्रकरणी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृ

चाकूने वार करून रॉबरी करणारा आरोपी जेरबंद; बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुण्यातील चंदननगरमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा चिरला गळा
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
युसूफ पठाणच्या सास-यासह मेहुणा अटकेत - पुरोगामी विचाराचे एकमत

मुंबई : भायखळा परिसरात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाने अचानक उग्र रूप धारण करत मारहाणीपर्यंत मजल मारली. या प्रकरणी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून एक वाहन गेल्याने पाणी उडाले आणि त्यावरून वादाची ठिणगी पडली. युसूफ खान (30) हे आपल्या वाहनातून घरी जात असताना खड्ड्यातील पाणी शोएब खान (35) यांच्यावर उडाले. यानंतर युसूफ खान यांनी तत्काळ वाहन थांबवून माफी मागितली, मात्र शोएब खान संतप्त होऊन शिवीगाळ करू लागला. त्याने बांबूच्या काठीने वाहनाची समोरील काच फोडत युसूफ खान यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेत घरी परतलेल्या युसूफ खान यांना कुटुंबीयांनी तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. मात्र पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांची गाठ खालिद खान आणि त्यांच्या नातेवाईकांशी पडली. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक झटापटीत झाले. तपासात उघड झाले की, आरोपींनी बांबूच्या काठ्या व दांडक्यांसह हल्ला केला. या मारहाणीत युसूफ खान यांचा भाऊ सलमान याचा हात मोडला, तर काका झाकी अहमद गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात अनेक जणांचा सहभाग असून तो नियोजित स्वरूपाचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. भायखळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालिद खान, त्यांचा मुलगा आणि आणखी एका नातेवाईकाला ताब्यात घेतले. तर चौथा आरोपी शाहबाज पठाण अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS