Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या :मुख्यमंत्री फडणवीस ; वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी

मुंबई : आषाढी वारी काळात निघणार्‍या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना चांगल्या सुवि

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता
पंढरपूर कॉरिडॉरच्या 4 हजार कोटींचा प्रकल्पाला मंजूरी; भूसंपादन 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे शिखर समितीचे निर्देश
‘शताब्दी दीपस्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्काराने अमोलक संस्था सन्मानित;सरपंच परिषदेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई : आषाढी वारी काळात निघणार्‍या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणार्‍या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे 1303 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी 964 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील 959 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्‍वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकर्‍यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले आहेत.

पालखी मार्गावरील कामे पूर्ण करणे सुरू
पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकर्‍यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर 3700 मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा 5 हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

COMMENTS