Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार. डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातूर : राज्याच्या शैक्षणिक इतिहासात स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या ‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. गोपाळराव पा

अस्थिविकार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 
अखेर 9 वर्षांचा प्रतीक्षेचा शेवट: चर्‍हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; डॉ. गणेश ढवळे यांच्या आंदोलनाला यश
आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत; सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे : मंत्री आबिटकर
लातूर पॅटर्न'चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन |  Navarashtra

लातूर : राज्याच्या शैक्षणिक इतिहासात स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या ‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी सकाळी वयोमानानुसार निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यासह संपूर्ण राज्याच्या शिक्षण, वैद्यकीय आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, डॉ. पाटील यांनी शिक्षण आणि वैद्यकीय सेवेत दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या संस्थेमुळे लातूरला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख मिळाली. ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर, अभियंते आणि अधिकारी बनण्याची दिशा दिली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे लोक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखत. 3 ऑक्टोबर 1931 रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे त्यांचा जन्म झाला. उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. 1965 साली त्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, मात्र व्यवसायासोबतच समाजसेवेचा ध्यास त्यांनी कधीही सोडला नाही. मुरुड परिसरात सलग बारा वर्षे त्यांनी विनामूल्य आरोग्यसेवा दिली. या कार्यामुळे जनसामान्यांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले. डॉ. पाटील हे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला ‘लातूर पॅटर्न’ हा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. नियोजनबद्ध अभ्यास, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत मोठे यश मिळवले. हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

COMMENTS