Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत अंधार; पथदिवे बंद प्रकरणी चौकशीची मागणी

नांदेड : 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूका निघालेल्या असताना फुले मार्केट ते शिवाजीनगर या मार्गावर पथदिवे बंद हो

पंतप्रधानांविरूद्ध काँगे्रसची विशेषाधिकार भंगाची नोटीस; विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतांवर टिप्पणी करणे नियमाविरोधात
विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी !
देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयावरून श्रेयवादाची ठिणगी; खा. डॉ. अजित गोपछडे विरुद्ध आ. जितेश अंतापूरकर आमनेसामने
Pune : जांभूळवाडी कोळेवाडीतील पथदिवे बंद ; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

नांदेड : 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूका निघालेल्या असताना फुले मार्केट ते शिवाजीनगर या मार्गावर पथदिवे बंद होते व परिसरात लाईट नव्हती. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध संघटनांचा मोठा सहभाग या मिरवणुकीत असतो. यंदाही हजारो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मात्र, महत्त्वाच्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीदिनी नांदेड शहरातील फुले मार्केट ते शिवाजीनगर परिसरातील पथदिवे बंद असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक 8 चे काँग्रेस नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या दिवशी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे अपेक्षित होते. मिरवणुकीचा मार्ग लक्षात घेऊन पथदिवे सुरळीत राहतील, वीजपुरवठा खंडित होणार नाही आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. अंधारामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांसह सहभागी झालेल्या कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. गर्दीच्या ठिकाणी अपघात, चेंगराचेंगरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात शहरातील महत्त्वाच्या धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस यंत्रणा उभारावी, अशी मागणी सत्यपाल सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

COMMENTS