Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंजारवाडीला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ बनवण्याचा संकल्प-मा. सर्जेराव तात्या तांदळे

Oplus_131072 बीड : बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे मा. अ‍ॅड. श्री. सर्जेराव तात्या तांदळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत; धोत्रे ग्रामपंचायत प्रथम; १५ लाखांचे बक्षीस  
शिरसाटवाडीतील विकास कामांची शासकीय समितीकडून पाहणी
नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार
Oplus_131072

बीड : बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे मा. अ‍ॅड. श्री. सर्जेराव तात्या तांदळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी, जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच संत भगवान बाबा यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यामुळे परिसरात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान, समाजजागृती आणि युवकांना मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. मार्गदर्शन करताना तात्या तांदळे म्हणाले, आज तुम्ही माझ्यावर जो सन्मानाचा वर्षाव केला, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच मला गावासाठी चांगले काम करता आले. ते पुढे म्हणाले की, वंजारवाडीचा सर्वांगीण विकास करून हे गाव ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ बनवण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या तीन गोष्टींचे महत्त्व त्यांनी विशेष अधोरेखित केले. रस्त्यावर कचरा दिसल्यास तो उचलून कचराकुंडीत टाका आणि तरुणांनी वेळ वाया न घालवता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे, असे आश्वासन देत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. यावेळी वैजिनाथ नाना तांदळे, लक्ष्मणराव पवार, विशाल भैय्या, सोमिनाथ सर आणि राख महाराज यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रम आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला. सूत्रसंचालन दयावान सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लोमेश सर यांनी मानले.

COMMENTS