Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट

नांदेड : नांदेड तालुक्यातील मरळक व निळा परिसरात वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसत असून, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे परि

कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जखमी ; घरासह लाखोंचे नुकसान
सावधान! अनेक बँकांमध्ये खाती आहेत? मग ‘हे’ ५ धोके नक्की जाणून घ्या; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!
नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट –  Lokmanthan | लोकमंथन

नांदेड : नांदेड तालुक्यातील मरळक व निळा परिसरात वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसत असून, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रामाणिकपणे स्वखर्चातून सुविधा उभारणार्‍या शेतकर्‍यांनाच त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
निळा उपकेंद्रांतर्गत मरळक रोडवरील शेतकरी नंदकुमार बनसोडे यांनी शेतीसोबत शेळीपालन व कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. या व्यवसायासाठी सातत्यपूर्ण वीजपुरवठा अत्यावश्यक असताना, वारंवार खंडित होणार्‍या वीजेमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषतः वाढत्या उन्हाळ्यात जनावरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी व रात्री प्रकाशाची सोय करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून डीपी (डिस्ट्रिब्युशन पॅनेल) उभारला. मात्र, संबंधित लाईनमनकडून या डीपीचे काम पूर्ण करण्यात आले नसून ते अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आले आहे. याबाबत विचारणा केल्यावर हे काम माझ्याकडे नाही, मरळ विभागाकडे आहे, असे सांगण्यात येते, तर मरळ विभागाकडून हे निळा विभागाचे काम आहे, असे सांगून जबाबदारी टाळली जात आहे. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दरम्यान, रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनावरांचे हाल होत असून उष्णतेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी उत्पादन घटून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. स्वखर्चातून डीपी उभारूनही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जर रात्री वीजपुरवठा न झाल्यामुळे माझे नुकसान झाले, तर संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा नंदकुमार बनसोडे यांनी दिला आहे. या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकर्‍यांमध्येही तीव्र नाराजी पसरली असून, महावितरणने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS