Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

श्रीगोंदा :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूलच्या विद्यार्थ्य

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
सावित्रीच्याच लेकींचा डंका !

श्रीगोंदा :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशानिमित्त शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचा गौरव करण्यात आला.
समारंभात बोलताना पालकांनी शाळेचे सूक्ष्म नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हा उत्तम निकाल लागल्याचे सांगितले. वर्षभर शाळेत राबविण्यात आलेल्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच शालेय प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
यंदाच्या निकालात प्रथम पाच विद्यार्थ्यांनी विशेष यश मिळविले असून त्यामध्ये प्रद्युम्न भोस (९४.२०%), श्रुतिका कसरे (९०.८०%), सर्वज्ञा भोर (८८.६०%), श्रद्धा वाळके (८२.२०%) आणि यश जाधव (८१.२०%) यांचा समावेश आहे.
या वेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS