Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडीच्या लिंक कॅनॉलवरील पाणी वाटपावरून वाद; अन्यायकारक वितरणाविरोधात पाणी वापर संस्थांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील लिंक कॅनॉल क्रमांक १३२ वरील पाणी वाटपातील कथित अन्यायकारक धोरणांविरोधात पाणी वापर संस्थांनी एकत्र येत एल्गार पुकारला आहे. अपुऱ्या व असमान पाणीपुरवठ्यामुळे शेती धोक्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप संस्थांनी पत्रकार परिषदेत केला. संस्थांच्या मते, कालव्यावरील पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसून काही भागांना जादा पाणी दिले जात असताना इतर भाग पूर्णपणे वंचित राहत आहेत. नियोजित वेळापत्रकाचे पालन होत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून पाण्याच्या दाबातही मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली. तसेच कालव्यावर अनधिकृत पाणी उचल, वळवण आणि अपव्यय होत असल्याकडेही संस्थांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांकडून नियंत्रणाचा अभाव असल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी पाणी वापर संस्थांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या असून त्यामध्ये पाणी वितरणात पारदर्शकता आणणे, सर्व शेतकऱ्यांना समान व न्याय्य पाणी वाटप करणे, अनधिकृत पाणी वापरावर तात्काळ कारवाई करणे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे यांचा समावेश आहे. दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लिंक कॅनॉल १३२ परिसरात पाणी प्रश्नावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पारनेरमध्ये जल्लोष; श्रीगोंदयात आक्रोश कुकडी प्रकल्पाचे आवर्तन पारनेर तालुक्यात मुबलक प्रमाणात मिळाल्याने तेथील शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांचा सत्कार करून जल्लोष साजरा केला जात आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात मात्र पूर्ण दाबाने पाणी न मिळाल्याने पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप; दोषींवर कारवाईची ‘स्वाभिमानी’ची मागणी
अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार : वाकचौरे
बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा
The water resources department has issued an order that the water of the  Kukadi river left canal will be given to the farmers who fill the water  bills payment | कुकडीचे आवर्तन

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील लिंक कॅनॉल क्रमांक १३२ वरील पाणी वाटपातील कथित अन्यायकारक धोरणांविरोधात पाणी वापर संस्थांनी एकत्र येत एल्गार पुकारला आहे. अपुऱ्या व असमान पाणीपुरवठ्यामुळे शेती धोक्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप संस्थांनी पत्रकार परिषदेत केला.

संस्थांच्या मते, कालव्यावरील पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसून काही भागांना जादा पाणी दिले जात असताना इतर भाग पूर्णपणे वंचित राहत आहेत. नियोजित वेळापत्रकाचे पालन होत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून पाण्याच्या दाबातही मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे शेवटच्या टोकावरील शेतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार करण्यात आली.

तसेच कालव्यावर अनधिकृत पाणी उचल, वळवण आणि अपव्यय होत असल्याकडेही संस्थांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांकडून नियंत्रणाचा अभाव असल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी पाणी वापर संस्थांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या असून त्यामध्ये पाणी वितरणात पारदर्शकता आणणे, सर्व शेतकऱ्यांना समान व न्याय्य पाणी वाटप करणे, अनधिकृत पाणी वापरावर तात्काळ कारवाई करणे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लिंक कॅनॉल १३२ परिसरात पाणी प्रश्नावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पारनेरमध्ये जल्लोष; श्रीगोंदयात आक्रोश

कुकडी प्रकल्पाचे आवर्तन पारनेर तालुक्यात मुबलक प्रमाणात मिळाल्याने तेथील शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांचा सत्कार करून जल्लोष साजरा केला जात आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात मात्र पूर्ण दाबाने पाणी न मिळाल्याने पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे. 

COMMENTS