मिरजगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. अठरापगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य उभे केले, तर त्यांचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात उतरविले, असे प्रतिपादन ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. निमगाव गांगर्डे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. जाधव यांनी नव्या पिढीने अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. कुठल्याही बाबा-बुवांच्या आहारी जाऊ नये, असे सांगत त्यांनी विविध महापुरुष व संतांच्या विचारांचे उदाहरण देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संजय शेलार, मानवी हक्क अभियानचे चंद्रकांत डोलारे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन रोहन कदम, डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे अध्यक्ष तानाजी डाडर, बौद्धाचार्य कुलदीप गंगावणे, ॲड. दत्तात्रेय चव्हाण, आनंदराव गांगर्डे, मेजर एकनाथ गांगर्डे, बाबासाहेब गांगर्डे, मेजर गौतम कांबळे, मेजर भाऊसाहेब शेलार, महिला तालुका अध्यक्षा रुपालीताई आढाव, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, दीपक ससाने, तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव, दत्ता घोडके, बाबासाहेब घोडके, कुलदीप शेलार, रवि सोनवणे, गोदड समुद्र, शुभम पानसरे यांच्यासह भीम क्रांती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरजगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. अठरापगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य उभे केले, तर त्यांचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात उतरविले, असे प्रतिपादन ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. निमगाव गांगर्डे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. जाधव यांनी नव्या पिढीने अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. कुठल्याही बाबा-बुवांच्या आहारी जाऊ नये, असे सांगत त्यांनी विविध महापुरुष व संतांच्या विचारांचे उदाहरण देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संजय शेलार, मानवी हक्क अभियानचे चंद्रकांत डोलारे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन रोहन कदम, डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे अध्यक्ष तानाजी डाडर, बौद्धाचार्य कुलदीप गंगावणे, ॲड. दत्तात्रेय चव्हाण, आनंदराव गांगर्डे, मेजर एकनाथ गांगर्डे, बाबासाहेब गांगर्डे, मेजर गौतम कांबळे, मेजर भाऊसाहेब शेलार, महिला तालुका अध्यक्षा रुपालीताई आढाव, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, दीपक ससाने, तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव, दत्ता घोडके, बाबासाहेब घोडके, कुलदीप शेलार, रवि सोनवणे, गोदड समुद्र, शुभम पानसरे यांच्यासह भीम क्रांती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS